नवनिर्वाचित सभापतींनी स्विकारला पदभार

कराड : नूतन सभापतींच्या स्वागत प्रसंगी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्र यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर व इतर.

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) – कराड नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी नववर्षदिनी बिनविरोध पार पडल्यानंतर शुक्रवार, दि. 4 रोजी सर्व सभापतींनी आपले पदभार स्विकारले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
बांधकाम सभापती हणमंतराव पवार, पाणीपुरवठा सभापती अर्चना ढेकळे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगांवकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान व उपसभापती प्रियांका यादव यांनी आपल्या पदाचे पदभार स्वीकारले. स्थायी समिती सभापती पदासाठी नगराध्यक्षा व शिक्षण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष हे पदसिध्द सभापती आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेविका शारदा जाधव, अरुणा पाटील, माया भोसले, नगरसेवक किरण पाटील, महेश कांबळे, अतुल शिंदे, सुरेश पाटील, निशांत ढेकळे, राहूल खराडे, विनोद भोसले, प्रितम यादव, शिवराज इंगवले, ओंकार मुळे, नितीन ढेकळे, सुधीर एकांडे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)