नवनिर्मिती ग्रामविकास आघाडी-जनसेवामध्ये सरळ लढत

संग्रहित छायाचित्र

वडगाव गुप्ता ग्रामपंचायत निवडणूक : तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रचारात रंगत
नगर  –तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवनिर्मिती ग्रामविकास आघाडी व जनसेवा पॅनलमध्ये सरळ पण आटाततटीची लढत होण्याची शक्‍यता आहे. दोन्ही पॅनलने प्रचाराची सुरुवात केलेली आहे.
शहर व एमआयडीसीलगत असलेल्या वडगाव गुप्ता ग्रामपंचायत निवडणुकीत कै. विक्रम शेवाळे यांच्या प्रेरणेने नवनिर्मिती ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदासाठी विजय मुरलीधर शेवाळे उमेदवार आहेत. जनसेवा पॅनलचे सरपंचपदासाठी सुदाम नामदेव सातपुते उमेदवार आहेत. दि. 27 मे रोजी होणाऱ्या वडगाव गुप्ता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासह 16 सदस्यांची निवड होणार आहे. एकूण मतदार 5 हजार 100 असून वडगाव गुप्ता गावात शेवाळे, डोंगरे, यांचे मतदारामध्ये संख्यात्मक प्राबल्ये आहे. गव्हाणे, सातपुते, शिंदे, गिते यांचेही कमी अधिक प्राबल्ये आहे.
नवनिर्मिती ग्रामविकास आघाडीचे पॅनलप्रमुख म्हणून डॉ. बबनराव डोंगरे, मच्छिंद्र डोंगरे, भिमराज गव्हाणे, अशोक गुडगळ, आप्पासाहेब गव्हाणे यांच्यावर प्रचाराची मुख्य धुरा आहे. तर जनसेवा पॅनलचे प्रमुख म्हणून विद्यमान सरपंच भानुदास सातपुते, गुलाबराव शिंदे, बाबासाहेब शेवाळे, बाळासाहेब कोराळे यांच्यावर प्रचाराची मुख्य जबाबदारी आहे. नवनिर्मिती ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी विजय शेवाळे तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी, प्रभाग 1 मधून दिपक शिंदे, सुनीता डोंगरे, ज्योती आढाव, प्रभाग 2 मधून गणेश डोंगरे, बबन (नाना) कोऱ्हाळे, मंगल घाडगे, प्रभाग 3 मधून सारीका पिंपळे, उमेश डोंगरे, अंजना गुडगळ, प्रभाग 4 मधून बाबासाहेब गव्हाणे, जालिंदर डोंगरे, मिना गव्हाणे, प्रभाग 5 मध्ये विद्या शिंदे, चंद्रकला निकम, हुसेन गुलाब सय्यद यांना उमेदवारी दिलेली आहे.
तर जनसेवा पॅनलतर्फे सुदाम सातपुते सरपंचपदाचे उमेदवार असून सदस्यात्वासाठी प्रभाग 1 मधून चंद्रकला गिते, पूजा गव्हाणे, केशव शिंदे, प्रभाग 2 मधून सुरेखा बांगर, गोवर्धन शेवाळे, संजय गव्हाणे, प्रभाग 3 मधून ज्योती शेवाळे, भाग्यश्री शेवाळे, संजय ढेपे, प्रभाग 4 मधून गुलाब गिते, जगन्नाथ शेवाळे, मुक्‍ताबाई डोंगरे तर वार्ड क्रमांक 5 मधून विद्यमान सरपंच भानुदास सातपुते, भानुबाई निकम, मंगल चांदणे निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्मिती ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत परिवर्तनाचा संकल्प करून गावाच्या सर्वांगीण विकासावर जोर देत तरूण व उच्चशिक्षितांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. यामध्ये डोंगरे आडनावाच्या 4 जणांना उभे केलेले आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेत मुस्लीम समाजाच्या हुसेन सय्यद यांना उमेदवारी दिलेली आहे. तर जनसेवा पॅनलला ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकवयाची आहे. त्यांनी मागील 5 वर्षाच्या सत्ता काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 2 कोटी 37 लाखाची विविध विकास कामे केलेली आहेत, असे सांगितले जात आहे.
चौकट……….
नात्यागोत्याचे राजकारण…
जनसेवा पॅलनने नवनिर्मित ग्रामविकास आघाडीस शह देण्यासाठी शेवाळे आडनावाच्या 4 जणांना उमेदवारी देत राजकीय समीकरणात आपणही मागे नाहीत हे दाखवून दिलेले आहे. वडगाव गुप्ता ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या ठिकाणी दोन्हीही पॅनलने धनाढ्य व लोकमानास, नात्यागोत्याचे उमेदवार उभे केलेले असल्याने साम, दाम, दंड भेद या सर्व मार्गाचा वापर होण्याची शक्‍यता अहे. वडगाव गुप्ता मागील काही वर्षात निवडणुकीत झालेल्या संर्घषामुळे ही निवडणूक संवेदनशील म्हणून तालुक्‍यात परिचित आहे. त्यामुळे प्रशासनासह पोलीस प्रशासनाला सज्ज रहावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)