नवनाथांसह श्री दत्त मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता

नगर- तालुक्‍यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांच्या काल्याच्या किर्तनाने भक्तीमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. नऊ दिवस रंगलेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हजेरी लावली. तर यावेळी मंदिरात नवनाथांच्या मुर्तींसह श्री दत्त्ताच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.

दि.18 मार्च ते 26 मार्च पर्यंत गावात विविध भक्तीमय कार्यक्रम पार पडले. दररोज पहाटे काकड भजन, सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण तर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ व रात्री 9 ते 11 वा. किर्तनाचा कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घेतला. ह.भ.प. डॉ.विकासानंदजी महाराज मिसाळ (चास) यांनी संगीत श्रीमद भागवथ कथेत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) यांनी सादर केलेल्या राम जन्माच्या किर्तनात भाविक रममाण झाले होते.

महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे हे तीसावे वर्ष होते. या सोहळ्यासाठी साहेबराव बोडखे, पै.नाना डोंगरे, भागचंद जाधव, दिलावर शेख, भाऊसाहेब ठाणगे, गोरख फलके, नामदेव फलके, विठ्ठल फलके, चंदू जाधव, छगन भगत, गोरख गायकवाड, गोकुळ जाधव, अरुण फलके, सुनिल कापसे, अनिल डोंगरे, मच्छिंद्र डोंगरे, बबन जाधव, भाऊसाहेब जाधव आदिंचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ व अ.भा.वारकरी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)