नवज्योत सिद्धू यांचा खलिस्तानी दहशतवाद्यासोबत फोटो : विरोधकांकडून टीकास्त्र

नवी दिल्ली – करतारपूर कोरिडोरच्या भूमीपूजन समारंभामध्ये पंजाबच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि कॉग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू बुधवारी सहभागी झाले आणि पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. यावेळी त्यांनी एका खलिस्तानी दहशतवाद्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोवरून विरोधकांनी सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली असून राजीनामा मागितला आहे.

अकाली दलाचे नेते आणि आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी नवज्योत सिद्धू यांचा खलिस्तानी दहशतवाद्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत नवज्योत सिद्धू खालिस्तान समर्थक गोपाल सिंह चावलासोबत दिसत आहेत. या फोटोवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून सिद्धूच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
7 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)