नवज्योत सिंग सिध्दूवर राजद्रोहाचा खटला दाखल !

नवी दिल्ल: माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. तसेच त्याचबरोबर त्यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. शपथविधीप्रसंगी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याप्रकरणी सिद्धू यांच्यावर एका वकिलाने राजद्रोहाचा खटला दाखल केला आहे.

पाक लष्कराचे प्रमुख जनरल बाजवा आणि पाक व्याप्त काश्‍मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारीच सिद्धू यांना जागा देण्यात आली होती. पाक लष्कर प्रमुखांनी सिद्धु यांच्याशी अत्यंत जवळीकीने गप्पा मारल्या आणि त्यांनी त्यांना अलिंगन दिल्याचेही तेथे पहायला मिळाले.

दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील मुझफ्फरपूरच्या कोर्टात सिद्धू यांच्यावर का वकिलाने खटला दाखल केला आहे. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीप्रसंगी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)