नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा गायले पाकिस्तानचे गोडवे

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे गोडवे गायले आहे. हिमाचल प्रदेश मधील कसोली या ठिकाणी असलेल्या साहित्य उत्सवात त्यांनी पाकिस्तान प्रति आपले प्रेम व्यक्त केले.

“पाकिस्तानचा माझा दौरा दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा खूपच चांगला होता. तुम्ही पाकिस्तानात कधीही जा. तिथली भाषा, माणसे, खाद्यसंस्कृती काहीही बदलत नाही. मात्र तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथे तुम्हाला इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पाकिस्तानात असे काहीही नाही”, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

-Ads-

या विधानामुळे पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यापूर्वीदेखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेल्यानंतर त्त्यांनी पाकचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)