नवज्योतसिंग सिद्धू यांना इम्रान यांचा फोन कॉल

चंडीगढ – पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारणात सक्रिय असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यासाठी इम्रान यांनी व्यक्तिगत पातळीवर सिद्धू यांना फोन कॉल केला.

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख असणारे इम्रान 18 ऑगस्टला इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण इम्रान यांच्या भारतातील जुन्या मित्रांना देण्यात येणार असल्याचे पीटीआयकडून आधीच सांगण्यात आले. त्यानुसार, सिद्धू यांच्याबरोबरच कपिल देव आणि सुनील गावसकर या दिग्गज माजी भारतीय क्रिकेटपटूंना निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे.

-Ads-

मात्र, कपिल आणि गावसकर यांच्याशी इम्रान यांनी संपर्क साधला की नाही ते तातडीने स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पंजाबचे मंत्री असणाऱ्या सिद्धू यांनी इम्रान यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छाही त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाला कळवली आहे. आता इम्रान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कपिल, गावसकर आणि सिद्धू पाकिस्तानला जाणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)