नवज्योतसिंग सिद्धू प्राप्तीकर विभागाच्या कचाट्यात…

नवज्योतसिंग सिद्धूची दोन बॅंक खाती गोठवली
चंदीगढ – आपल्या भाषणामुळे सतत चर्चेत असलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू प्राप्तीकर विभागाच्या कचाट्यात सापडले आहेत. अनेक वस्तूंचा कर न भरल्याने प्राप्तिकर विभागाने सिद्धू यांची दोन बॅंक खाती गोठवली आहेत.
सिद्धू यांनी आपल्या विवरण पत्रात कपड्यांवर 28 लाख, प्रवासावर 38 लाखांपेक्षा जास्त, इंधन खर्च सुमारे 18 लाख आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 47 लाखांहून अधिक खर्च दाखवल्याचे समजते.

वर्ष 2014-15 च्या विवरण पत्रात सिद्धू यांनी हे खर्च दाखवले नव्हते. त्यांनी अजून याचे बिलही सादर केलेले नाही. परंतु, सिद्धू यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली असल्याचे सांगितले आहे. एकतर या सर्वांचे बिल सादर करा किंवा कर भरून टाका, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने सिद्धूंना तीन नोटिसा पाठवल्या आहेत. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने थेट कारवाई करत 14 फेब्रुवारीला सिद्धू यांची दोन बॅंक खाती गोठवण्यात आली.

दरम्यान, अकाली दलाने सिद्धूंवर टीव्ही शोमध्ये सहभागी होण्यावरून निशाणा साधला आहे. मंत्री महोदयांकडे जनतेसाठी वेळ नाही. पण टीव्ही शोसाठी भरपूर वेळ आहे. जनतेने कुठे जावे आणि कोणाला भेटावे ? असा सवाल उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)