नवजीवन बालकाश्रमास साळवे कुटुंबियांची 25 हजार रुपयांची वस्तू स्वरूपात देणगी

नगर – मूळचे अहमदनगर येथील रहिवाशी व सध्या पालघर जिल्ह्यात सब रजिस्टार पदावर कार्यरत असणारे संजय साळवे यांच्या कुटुंबियांकडून पाथर्डी तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथे असलेल्या नवजीवन बालकाश्रमातील अनाथ, निर्धार विद्यार्थ्यांना कपडे, दैनंदिन वापरातील विविध वस्तू, धान्य व किराणा अशा वस्तू स्वरूपातील पंचवीस हजार रूपयांची मदत केली.यावेळी उद्योजिका अस्मिता साळवे, शुभम साळवे, समृद्धी साळवे, नवजीवनच्या संगीत पवार, उदय पवार, समीक्षा पठारे, अनिकेत मगर आदी उपस्थित होते. नवजीवन प्रतिष्ठानच्या वतीने पाथर्डी तालुक्‍यातील माळीबाभुळगावातील अनाथ, निराधार, व भटके विमुक्त विद्यार्थ्यांनसाठी नवजीवन बालकाश्रम चालविले जाते.सध्या तेथे 92 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे 6 ते 18 वयोगटातील गरजू, निराधार, अनाथ मुलांचे मोफत संगोपन व शिक्षण केले जाते. नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नवजीवन बालकाश्रम चे अधीक्षक रवींद्र पवार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)