नवजात अर्भकांची विक्री प्रकरणी 8 जणांना अटक

नवी दिल्ली – नवजात अर्भकांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी 8 जणांना अटक केली आहे. या आठही जणांना गेल्या महिन्याभरात अटक झाली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण केवळ नवजात अर्भकांना निपुत्रिक दाम्पत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असत. या रॅकेटशी संबंधित असलेल्या अन्य व्यक्‍तींचा शोध सुरू आहे. या रॅकेटच्या मूळाशी एक महिला असल्याचा संशय असून अद्याप तिला अटक व्हायची आहे. असे पोलिसांनी सांगितले.

नवजात अर्भकांची विक्री करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला गेल्या महिन्यात समजली होती. त्यानंतर संशयितांकडे पोलिसांचे “तोतया दाम्पत्य’ पाठवून तपासणी केली गेली होती. या दाम्पत्याला नवजात अर्भक दिले गेल्यावर या आरोपीला अटक करण्यात आली.

आतापर्यंत चार नवजात बाळांची सुटका करण्यात आली आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या नवजात बाळांचे हॉस्पिटलमधून अपहरण केले गेले असावे, या शक्‍यतेच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र अद्याप बाळ बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आलेली नाही.

या बाळांच्या मूळ पालकांना त्यांचे अपत्य जिवंत नसल्याचे हॉस्पिटलकडून कळवले असावे आणि बाळ या रॅकेटच्या स्वाधीन केले गेले असावे. त्या शक्‍यतेच्या आधारे तपास सुरू आहे. पालकांनी स्वतःच आपली नवजात अपत्ये पैशाच्या लोभापायी या लोकांच्या स्वाधीन केली असावीत. या रॅकेटचे जाळे देशाबाहेरही पसरले असावे. काही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचाही या रॅकेटमध्ये हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)