नळावरील भांडणाच्या खटल्याचा 23 वर्षानंतर निकाल : चांगल्या वर्तुणूकीच्या हमीवर 59 वर्षीय महिलेची सुटका

पुणे – पूर्व वैमनस्यातून नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेशी भांडण करून त्यांच्या हाताचा चावा घेतल्याच्या खटल्याचा निकाल तब्बल 23 वर्षांनी लागला आहे. न्यायालयाने 59 वर्षीय महिलेची एक वर्षाच्या चागल्या वर्तवणुकीच्या हमीवर सुटका केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे.
पार्वतीबाई दशरथ गायकवाड (वय 59, रा. खराडी, चंदननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मंगल अनंत कांबळे (रा. चंदननगर, खराडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर, कविता संजय घोलप या गुन्ह्यात अद्यापही फरार आहे. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी बाजू मांडली. त्यांना न्यायालयीन कामकासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि पोलीस हवालदार एस. बी. सोडकर यांनी मदत केली.
23 वर्षांपूर्वी म्हणजेच 28 ऑक्‍टोबर 1995 रोजी फिर्यादी आणि पार्वतीबाई तसेच कविता या शेजारीच राहण्यास होत्या. मंगल कांबळे यांच्या जागेत राडारोडा टाकल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती. घटनेच्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मंगल या त्यांच्या घराजवळील नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पार्वतीबाई आणि कविता याही होत्या. त्यावर कविता यांनी भांडणे काढताना “तु मला दोन दिवसापूर्वी नवीन साडी घेतली का’ या बद्दल का विचारले म्हणून “तु माझ्याशी का बोलली’ म्हणत दोघींनी फिर्यादींना मारहाण केली. पार्वतीबाई यांनी मंगल यांची केसे धरून कविताने त्यांच्या दंडाचा चावा घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र दाखल झाले. खटल्यात तब्बल 23 वर्षे तारिख पे तारिख पडत गेली. न्यायालयाने या प्रकरणात पार्वतीबाईंचे वय ग्राह्य धरून हा गुन्हा घडल्यानंतर त्यांच्यावर दुसरा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा विचार केला. पूर्व इतिहास आणि वर्तमान हे गुन्हेगारी स्वरुपाचे नसल्याने न्यायालयाने चांगल्या वर्तुवणुकीच्या हमीवर पार्वतीबाईंची सुटका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)