नळस्टॉप चौकातून “ट्रॅफिक डायव्हर्शन’

file photo

पुणे – मेट्रो कामासाठी कर्वे रोडवर वाहतूक बदल करण्यात आले आहेज. नळ स्टॉप येथून “ट्रॅफिक डायव्हर्शन’ करुन हलकी वाहने पौड रोड-एसएनडीटी-आठवले चौक मार्गाने वळविण्यात येणार आहे. तर जड वाहने सरळ सोडण्यात येणार आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली.

नळस्टॉप परिसरात उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. यानुसार डिसेंबरमध्येही वाहतूक बदल चाचणी घेण्यात आली. मात्र, ती अपयशी ठरल्याने हे काम “सीओईपी’कडे देण्यात आले होते. “सीओईपी’ने अभ्यास करुन दोन पर्यायी मार्ग सूचविले. ज्यामध्ये पर्याय-1 मध्ये कर्वे रस्त्याच्या दिशेने दुतर्फा वाहतूक एसएनडीटी चौक ते अभिनव चौकपर्यंत सुरू ठेवणे, तर, पर्याय-2 मध्ये हलकी वाहने पौड रोड-एसएनडीटी-आठवले चौकाच्या दिशेने वळविणे असा देण्यात आला. या पर्यायांवर महामेट्रो आणि वाहतूक पोलिसांत चर्चा झाली. तसेच, शुक्रवारी (दि.4) रोजी महा मेट्रोच्या कार्यालयामध्ये स्थानिक प्रतिनिधींसह पुन्हा चर्चा करण्यात आली. यात स्थानिक नागरिक, नगरसेविकांनी पर्याय क्रमांक-2 ला सहमती दिली. यानुसार हे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, यासाठी महा मेट्रोद्वारे कोथरूड, डेक्कन आणि शिवाजीनगर येथील ट्रॅफिक विभागाला 4 टोइंग वाहन आणि क्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निर्माणाधीन कार्यस्थळाच्या 1 कि.मी अंतरापासून योग्य त्याठिकाणी वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार फलक लावण्यात येणार आहे. तसेच परिसरात शक्‍य असेल त्याठिकाणी महा मेट्रो द्वारे फुटपाथची रुंदी वाढविण्यात आल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)