नलेश लंके प्रतिष्ठान तर्फे सैनिकाचा सन्मान

सुपा – पारनेर तालुक्‍यातील हंगा गावचे सुपुत्र राहुल नाना आल्हाट (मेजर) हे जम्मू- काश्‍मिर येथे 13 महार रेजिमेंटमध्ये देशसेवा करत आहेत. काश्‍मिर मधील अखनूर सेक्‍टरमध्ये दहशवाद्यांशी लढताना एक गोळी त्यांच्या पायाला लागली असताना त्यांनी जीवाची परवा न करता गंभीर जखमी अवस्थेत असताना सुद्धा दहशतवादी हल्ला परतून लावला होता.
सध्या मेजर राहुल नाना आल्हाट हे आपल्या मूळ गावी हंगा येथे विश्रांती घेत आहेत. त्यांच्या या देशसेवेच्या महान कार्याची दखल घेऊन पारनेर-नगर तालुक्‍याचे लोकनेते निलेश लंके यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. मेजर राहुले आल्हाट यांना मिलिटरी भरती करण्यात सन्मानिय निलेश लंके यांचा खूप मोठा वाटा होता हे विशेष.
आपल्या गावातील या सुपुत्राचे देश सेवेचे कार्य पाहून बुधवार दि.27 रोजी हंगा येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मेजर राहुल नाना आल्हाट यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आल्हाट यांचा सन्मान करताना अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या राणी लंके , हंगा गावचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सोपान मोकाते, व्हाईस चेरमन बाळू शिंदे, उपसरपंच, संदिप शिंदे, सतीश दळवी तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, गावातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)