नलिनी चिदंबरम यांच्यावरील कारवाईस स्थगिती

नवी दिल्ली – शारदा चिट फंड घोटाळ्यात माजी मंत्री पी. चिदंबरम्‌ यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम्‌ यांच्या विरोधात दडपशाहीची कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती ए. के.सिक्री, न्या. अशोक भूषण यांनी सक्तवसुली संचालनालयास तसा आदेश जारी केला आहे.

नलिनी चिदंबरम्‌ यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स विरोधात दाखल केलेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. एक सदस्यीय न्यायालयाने नलिनी चिदंबरम्‌ यांची सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स विरोधातील याचिका फेटाळली होती. त्यावर त्यांनी 10 जुलैला मद्रास उच्च न्यायालयात अपील केले. तेही फेटाळण्यात आले.

-Ads-

पीएमएलए कायद्याच्या कलम 50 (2) अन्वये उच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कुणालाही उपस्थित करण्यासाठी समन्स जारी करण्याचा अधिकार आहे. महिलांना त्यांचे निवासस्थान असलेले शहर सोडून दुसरीकडे चौकशीसाठी बोलावता येत नाही. गुन्हेगारी दंडसंहितेच्या कलम 160 मध्ये तशी तरतूद आहे, असा नलिनी चिदंबरम्‌ यांचा युक्तिवाद होता, पण न्यायालयाने तो फेटाळला होता.

नलिनी यांना शारदा समूहाने दूरचित्रवाणी वाहिनी खरेदी प्रकरणी कंपनी कायदा मंडळ व न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी 1 कोटी रूपये दिल्याचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)