नलिनी चिदंबरम यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

चेन्नई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांना शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. उच्च न्यायालयाने घोटाळय़ाप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी ईडीकडून मिळालेल्या समन्सला आव्हान देणारी नलिनी यांची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे नलिनी यांना साक्षीदार म्हणून हजर रहावे लागणार आहे.

चौकशीसाठी महिलांना भादंविचे कलम 160 अंतर्गत निवासस्थानाबाहेर बोलावले जाऊ शकत नसल्याचा दावा नलिनी यांनी याचिकेत केला होता. परंतु हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. हे कलम कोणत्याही प्रकरणातील स्थितीवर निर्भर असून याप्रकरणी ही सूट दिली जाऊ शकत नसल्याचे न्यायाधीश एस.एम. सुब्रमण्यम यांनी म्हटले. न्यायालयाने ईडीला चौकशीसाठी नवी तारीख निर्धारित करण्याचा आणि नव्याने समन्स बजावण्याचा निर्देश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)