नर्सिंग संस्थेतर्फे राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन

पुणे – नर्सिंग आणि वैद्यकीय व्यवसाय समान पातळीवर असायला हवे. याबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहिले असल्याचे सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शुक्रवारी सांगितले. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी करण्यात आले. “प्रसूतिशास्त्रातील सेवेचे सक्षमीकरण’ या विषयावर या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

नर्सेसना देखील वैद्यकीय व्यवसाय करण्याला परवानगी द्यावी, असे डॉ. मुजुमदार म्हणाले. यावेळी “फॉगसी’च्या उपाध्यक्षा डॉ. लीला व्यास, प्रसुतीतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते, सिम्बायोसिसमधील आरोग्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, मुकुल माधव फाउंन्डेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया, सिम्बायोसिसच्या प्रकुलगुरू आणि प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. त्यांनी परिषदेत मार्गदर्शनही केले.

ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेची स्थितीविषयी व्यास यांनी माहिती दिली. नर्सेसच्या कोर्सबद्दलची माहिती डॉ. गुप्ते यांनी दिली. अनुभवी नर्सेसना मेडिकल उपकरणाविषयी प्रशिक्षण द्यावे, असे मत डॉ. येरवडेकर यांनी मांडले. डॉ. शारदा यांनी स्वागत केले. सीतादेवी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)