नर्मदा-गंभीर परियोजना – 50 दिवसांत 427 फूट चढून नर्मदा इंदूर जिल्ह्यात

इंदूर (मध्य प्रदेश) – नर्मदा-गंभीर परियोजनेनुसार नर्मदा नदी 427 फूट उंची पार करून इंदूर जिल्ह्यात पोहचली आहे. नदी किनाऱ्यापासून बहिरूघाटापर्यंत नर्मदेला आणण्यासाठी 50 दिवस काम करावे लागले आहे. दुर्गम पहाड, तीव्र चढण पार करून चार पंपिंग स्टेशन्सच्या साह्याने नर्मदा नदी सोमवारी रात्री इंदूर जिल्ह्यातील दतोदा गावापर्यंत पोहचली आहे. तीन टप्प्यात 500 एमएलडी पाणी शहरापर्यंत येणार आहे, आणि नर्मदा शिप्रा संगमातून 400 एमएलडी पाणी येणार आहे.

नर्मदा गंभीर प्रकल्पामुळे 1300 एमएलडी पाणी इंदूर आणि उज्जैन जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याचे पाणी पुरवणार आहे, आणि हजारो हेक्‍टर शेतीलाही पाणी पुरवठा करणार आहे. बडवानपासून 38 किलोमीटेर्सपर्यंत चाचणी पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकूण 68 किमी लांबीच्या मोठया पाईपलाईनने बडी कलमेर गावापर्यंत पाणी पोहचवले जाणार आहे. उंच भागात पाणी पोहचवणे हेच सर्वात कठीण काम होते, यापुढे गुरुत्बाकर्षणाने पाणी खाली जाणार आहे. त्यासाठी वीजेचा खर्चही येणार नाही.

-Ads-

सोमवरी रात्री दतोदा येथील बॅकप्रेशर टॅंकपर्यत नर्मदेचे पाणी पोहचले तेव्हा गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने नर्मदा माईचे स्वागत केले. उरलेल्या भागाची चाचणीही लवकरच करण्यात येईल असे एनव्हीडीएचे कार्यकारी इंजिनीयर संजय जोशी यांनी सांगितले. नर्मदेचे पाणे गंभीर नदीत सोडण्यासाठी कलमेर येथे नर्मदा घाटी विकास निगम (संगम स्थळ) तयार करत आहे. दीड महिन्यात येथेपर्यंत पाणी आणण्याची चाचणी पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकाऱ्यांनी ठेवले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)