नर्गिस फाखरी पुन्हा अफेअरमध्ये

अमेरिकन मॉडेल आणि ऍक्‍ट्रेस नर्गिस फाखरी पुन्हा एकदा रिलेशनशीपमध्ये अडकली आहे. सध्या ती अमेरिकन डायरेक्‍टर मॅट अलोंझोबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजते आहे. स्वतः नर्गिसनेच इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमधून ही बातमी जगभर प्रसिद्ध केली आहे. रणबीर कपूरच्या “रॉकस्टार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नर्गिस फाखरीची दखल अख्ख्या बॉलिवूडने घेतली होती. विशेषतः नर्गिसच्या इमोशनल सीनमुळे सगळ्यांचीच नजर तिच्यावर खिळली होती. हिंदी सिनेमातल्या या इमोशनल सीनसाठी तिला केवळ “लीप सिंक’ करायचे होते. कारण तिला हिंदी समजतच नव्हते. बोलताही येत नव्हते. पण तरीही तिने व्यक्‍त केलेल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या.

“रॉकस्टार’नम्तर तिला अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र “हाऊसफुल्ल 3′ आणि “बॅन्जो’ हे आणखीन दोन सिनेमे केल्यावर तिने थोडावेळ ब्रेक घेतला. भारतातल्या हवामानाला ती जुळवून घेऊ शकली नाही. काही दिवसांनी तिला पुन्हा न्यूयॉर्कला जायला लागले. हॉलिवूडमधील मॉडेलिंगच्या असाईनमेंट संपवल्यावर ती जेंव्हा भारतात आली तेंव्हा उदय चोप्राबरोबर तिचे सूत जुळले होते. नर्गिस आणि तिची आई उदय चोप्राच्याच घरात रहात होते. मात्र हॉलिवूडच्या मॅट अलोंझोबरोबर एका फोटोशूटमध्ये ती मॅटला कीस करताना दिसली आणि उद्‌य चोप्राचे माथे भडकले. त्याने तिला चक्क घरातून हाकलून दिले होते. या सगळ्या घडामोडींनंतर नर्गिस पुन्हा एकदा मॅट अलोंझोबरोबर अफेअरमध्ये आली आहे.
नर्गिसने पुर्वी रोमिओ ऍन्ड ज्युलिएट नावाने स्वतःचे आणि मॅटचे काही फोटो शेअर केले होते. आपण नेहमी एखाद्या गोष्टीची अपेक्षा करत असू, तर ती मिळवायला पाहिजे. काही मिळवण्यासाठी धडपडही केली पाहिजे, असेही तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. व्हेनिसमध्ये मॅट आणि ती एका फॅशन शो मध्ये सहभागी झाल्याचे दिसते आहे. इन्स्टाग्रामवर तिचे स्टेटस आता “सिंगल’ नाही. या फोटोंना आता “लाईक’ही खूप मिळत आहेत. नर्गिस पुन्हा एकदा रिलेशनशीपमध्ये आल्याचा आनंद तिच्या फॅन्सना जरा जास्तच झालेला दिसतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)