नर्गिस फाकरी येतेय घाबरवायला

नर्गिस दिसायला सुंदर आहे. तिची व्यक्‍तिरेखा नेहमी रोमॅंटिक दाखवली जाते. नर्गिस फाकरी म्हटले की, समोर येते तिची रोमॅंटिक इमेज. तिचा रॉकस्टार सिनेमा असो नाहीतर हाऊसफुल 3 तिचा स्वीट लूक आठवतो. मात्र आता हीच नर्गिस घाबरवायला येते आहे. नर्गिसचा नवा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचं नाव आहे आमावस. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता सचिन जोशी परत सिनेमात येतोय. या सिनेमात तो नर्गिसचा नायक आहे.

अमावसचा ट्रेलर रिलीज झालाय. तो पाहून अंगावर काटाच येतोय. 1920 इव्हिल रिटर्न्स, रागिणी एमएमएस 2 सारखे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक भूषण पटेल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हॉरर सिनेमा चालणे हे खरं तर मोठे आव्हान असते. राम गोपाल वर्माने भूत हा हॉरर सिनेमा बनवला. तो हिट झाला. पण त्यानंतरचे त्याचे हॉट सिनेमे फारसे चालले नाहीत. पण रागिणी एमएमएस, एक थी डायन, राज 3, फुंक असे काही हॉरर सिनेमे चालले. आता अमावासला काय प्रतिसाद मिळतो हे जानेवारीत कळेल. सिनेमा 11 जानेवारीला रिलीज होतो आहे.

नर्गिस फाकरी आणि उदय चोप्राचे रिलेशन संपुष्टात आल्याचे समजले होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांना एकत्र बघितले गेले होते, त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र आल्याचे बोलले जायला लागले आहे. हे दोघेही पुढच्या वर्षी लग्न करणार असेही बोलले जायला लागले होते. मात्र नर्गिसच्या प्रवक्‍त्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.ती न्यूयॉर्कमध्येच राहते. ती काही म्युझिक अल्बम्ससाठी मुंबईत आली आहे. केवळ काही भेटी गाठी करण्यासाठी ती मुंबईत आली होती. कोणतेही नातेसंबंध वाढवण्याचा तिचा उद्देश नाही, हे तिच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

उदय चोप्रा आणि नर्गिस फाकरी यांच्यातले अफेअर बॉलीवूडला काही नवीन नाही. काही काळापूर्वी नर्गिस आणि तिची आई उदयच्याच घरात रहात होते. पण हॉलीवूडमधील नर्गिसच्या मित्रांशी नर्गिसच्या असलेल्या खास मैत्रीवरून उदयने या मायलेकींना घराबाहेर काढले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)