नरेगा अंतर्गत जिल्ह्याला साडेसहा हजार विहिरी

प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांचे निर्देश

नगर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात एक हजार 964 कामे सुरू असून यावर 8 हजार 933 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये घरकुल, शौचालय, रोपवाटिका, फळबाग लागवड, शेततळे, रस्ते, तुती लागवड आदी कामांसोबतच नरेगा अंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचा सामावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या चौदाही तालुक्‍यात हजारो सिंचन विहिरींचे काम मंजूर करून ते हाती घेण्यात आली आहेत. प्रशासकीय यंत्रणेमार्फतही लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून विहिरींचे बांधकामगतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना वेग देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालकमंत्री शिंदे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत उपस्थित होते. जिल्ह्यात सध्या बहुतांश ठिकाणी शेतीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे मजुरांना रोजगाराची गरज आहे.

रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहिरींची कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात 272 विहिरींची कामे सुरू आहेत. अधिकाधिक मजुरांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहेत. रोजगार हमी योजनेमध्ये यापूर्वी मंजूर असलेल्या विहिरींच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. जे प्रस्ताव आलेले आहेत, ते तपासून तात्काळ मंजूरीच्या सूचना प्रा. शिंदे यांनी दिल्या. अहिल्यादेवी सिंचन योजनेद्वारे 2016-17, 2017-18 व 2018-19 या तीन वर्षांत तीन हजार 800 विहिरी करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. यापैकी दोन हजार 286 विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये तीन वर्षांत विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे ते म्हणाले.


सध्या सुरू असलेली कामे व मजूरस्थिती

घरकुल-1182 कामांवर 3 हजार 708 मजूर, शौचालय- 17 कामांवर 43 मजूर, रोपवाटिका- 67 कामांवर 645 मजूर, रस्ता दुतर्फा वक्ष लागवड- 233 कामांवर 216 मजूर, फळबाग लागवड – 324 कामांवर 1 हजार 249 मजूर, गट लागवड – 34 कामांवर 216 मजूर, विहिर – 34 कामांवर 343 मजूर, शेततळे – 2 कामांवर 6 मजूर, नॅपेड- 1 कामावर 1 मजूर, रस्ते- 14 कामांवर 1 हजार 1 मजूर, तुती लागवड- 8 कामांवर 43 मजूर आणि इतर – 48 कामांवर 373 मजूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)