नरेंद्र मोदी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार वाराणसीतून

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ ची लोकसभा निवडणूक वाराणसी मतदारसंघातूनच लढवणार असल्याचा खुलासा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळेस बोलत होते.

यावेळी बोलताना शहा म्हणाले की, उत्तरप्रदेशात एसपी-बीएसपीनं केलेल्या हातमिळवणीमुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीतही वाराणसी मतदारसंघातूनच निवडणुकीला उभे राहतील. दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून त्यांचा उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही. इथं पुन्हा एकदा भाजपच प्रचंड बहुमतानं निवडून येणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)