नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांना दिली मोठी भेट !

उत्तर प्रदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गढ गोरखपूर मध्ये मोदींनी ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना’ सुरु केली. दरम्यान, या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम थेट 1.1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.

नरेंद्र मोदी म्हणाले, उर्वरित शेतकऱ्यांना काही हप्त्यांमध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम मिळेल. ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक वर्षी 75,000 कोटी रुपये शेतक-यांना थेट पोचणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते समोर म्हणाले, राज्य सरकारला काही करायची आवश्यकता नसून फक्त प्रामाणिक यादी करणे आणि आम्हाला सूची देणे. जितक्या लवकर सूची येईल तितके चांगले. तसेच अनेक राज्य अजूनही झोपेत असून त्यांच्या राज्यातील शेतकरी जर लाभापासून वंचित राहिले तर त्या शेतकऱ्यांचा श्राप राजकारण्यांचे राजकीय भविष्य उध्वस्त करतील. असा टोला मोदींनी विरोधकांना लावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)