नरेंद्र मोदी म्हणजे देशात असलेला दहा तोंडी रावण- आ. विद्या चव्हाण

पुणे:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र राज्यव्यापी संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या दरम्यान आज पुणे येथील बालेवाडीत गणेश कला, क्रीडा मंडळ येथे संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

दरम्यान, आमदार विद्या चव्हाण यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. देशात आणि राज्यात सत्तांतर झाल्यापासून देशात आणि राज्यात एक अस्थिरता निर्माण झाली आहे, असे मत व्यक्त केले. भाजपचे एक आमदार म्हणतात की देशावर ब्राह्मणांचे वर्चस्व असेल म्हणजे यांच्या डोक्यातून जातीव्यवस्था आजही जात नाही. नरेंद्र मोदी म्हणजे देशात असलेला दहा तोंडी रावण. या रावणाला आपल्याला रोखावंच लागेल. देश संकटात आहे देशाला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं, असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)