नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी ; राहुल गांधी आक्रमक !

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष्य राहुल गांधी यांनी केला आहे. राफेल करारावरुन राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. “नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले”, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.

राफेल करारावरुन प्रश्न उपस्थित झाले असताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती ?, असा प्रश्न देखील राहुल गांधींनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. आणि त्यांच्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज आहे तरी त्यांच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

-Ads-

राफेल प्रकरणावरून काँग्रेस भाजपाला कोंडीत पकडत आहे. ” आम्ही नरेंद्र मोदींना लोकसभेत प्रश्न विचारले पण ते आमच्या डोळ्यात डोळे घालू शकले नाही” असे देखील ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)