नरेंद्र मोदी गद्दार; टीडीपीच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

विजयवाडा – तेलगु देसम पार्टीचे नेते आणि तेलगु अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने बालकृष्ण यांनी नरेंद्र मोदींना गद्दार म्हटले आहे. बालकृष्ण हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे चिरंजीव आहेत.

ते म्हणाले की, ‘मोदी कुठेही लपले, भलेही ते बंकरमध्ये घुसून बसले तरीही भारत माता त्यांना दफन केल्याशिवाय राहणार नाही. आता मोदींना विरोध सुरु झाला आहे, आम्ही शांत बसणार नाही.’ दरम्यान भाजपने बालकृष्ण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

बालकृष्ण पुढे म्हणाले की,’भाजप आणि मोदींनी ज्या पद्धतीने टीडीपीला वागणूक दिली आहे त्यामुळे आम्हाला संबंध तोडावे लागले. आम्ही चार वर्षे वाट पाहिली होती.या काळात सर्व मार्ग अवलंबून पाहिले, साम-दाम-भेद. आता दंड बाकी आहे. आम्ही मोदींना तेलगु जनतेची काय ताकद असते ते दाखवून देऊ. आता मोदींकडे मागण्याची नाही तर त्यांच्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)