नरेंद्र मोदी आत्मविश्वास गमावलेले पंतप्रधान- नवाब मलिक

फक्त मन की बात… जन की बात नाहीच! ; नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर नवाब मलिक यांची टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जन की बात दिसलीच नाही. आत्मविश्वास गमावलेले पंतप्रधानच मुलाखतीत दिसले, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. जी मन की बात रेडिओवर ऐकायला येत होती, ती टिव्हीवर दिसली हाच काय तो फरक, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलिक पुढे म्हणाले, ४ वर्षांत सरकारने काय केले, नोटबंदीने काय साध्य झाले हे पंतप्रधान मोदींनी सांगितलेच नाही. या मुलाखतीतून जनतेला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडलीच नाहीत, अशी खंत मलिक यांनी व्यक्त केली. १०० दिवसांत नरेंद्र मोदी यांचे हे सरकार जाणार, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)