नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची ओळख बदलली

रावसाहेब दानवे यांची पंतप्रधानांवर स्तुतिसुमने
नाशिक : राज्यातील महापालिकांचा प्रचार हा हायटेक तर होतच आहे परंतू, आता या जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरची उदाहरणे देण्यास राजकीय पक्षांनी सुरूवात केली असल्याचे दिसत आहे. विरोधकांवर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीदेखील असेच उदाहरण नाशिकमध्ये दिले. भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंह यांची जागतिक पातळीवर ओळख होती. परदेशात कुणी त्यांना ओळखतही नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ओळख बदलली, त्यांच्या स्वागताला थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा विमानतळावर यायचे, असे सांगत दानवे यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
नाशिकमधील सभेत ते बोलत होते. कॉंग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती आहे, भाजपच्या यशाने शिवसेनेचे पोट दुखत आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. अमित शाहांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर आहे. तुमची शोधायची कुठे?, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असेही दानवे म्हणाले. मराठवाड्याला पाणी सोडण्यावरुनही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचे दानवे म्हणाले. शिवाय 1400 कोटी रुपये खर्च करुन आम्ही 24 टीएमसी पाणी अडवले, तर कॉंग्रेसने हेच काम 5 हजार कोटी रुपये खर्च करून, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही 8 वर्षात पूर्ण केले नसल्याचे सांगत कॉंग्रेसवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)