नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम

लवकरच भाजप प्रवेश करणार
मुंबई – कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वत:च्या ताब्यात ठेवून या महामंडळाची व्याप्ती वाढवायला हवी होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार, माथाडी कामगार नेते व नुकतेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळवर नियुक्ती झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून पाटील यांनी भाजपाचा रस्ता धरला. शिवसेनेचे उपनेते व वाहतुक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील यांची महामंडळावर वर्णी लावून भाजपाने त्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.

भाजपाच्या कोट्यातून माझी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणे योग्य नसल्याने आपण राजीनामा दिल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीस व भाजप प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार आपण लवकरच पक्षप्रवेश करणार आहोत. मात्र, मी भाजापातून कोणतीही निवडणूक लढविणार नाही.

माझी तशी मानसिकताही नसून मला महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूणांना व्यवसायात खंबीरपणे उभे करायचे आहेत. तसेच माथाडी कामगारांच्या समस्या सोडावायच्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)