नराधम संतोष पोळला फाशी कधी?

अनिल काटे

वाई तालुक्‍यातील सहा निष्पाप मानवी जीवांचा निर्घृण खून करत 2003 ते 2016 असा सलग तेरा वर्ष आसुरी आनंद घेत उजळ माथ्याने समाजात मोकाटपणे फिरणाऱ्या नराधम संतोष पोळाला गेली दोन वर्ष उलटले तरी ग्रामदेवतेला सोडलेल्या “पोळा’गत सरकारी पाहूणचार मिळत असल्याने पोळाची शिकार ठरलेल्या म्रत व्यक्तींच्या नातेवाईक व जनतेतुन नराधम ‘पोळा’ला कधी फाशी होणार? का ‘डुशा’ मारायला ‘पोळ’पुन्हा मोकाट तर उधळणार नाही ना ?असा भेदक भेदरलेला प्रश्न उपस्थीत करून काऴजी व भिती व्यक्त केली जात आहे.

दोन वर्ष्यापूर्वी 15 आँगस्ट 2016 च्या पूर्व संध्येला वाईसह सातारा पोलीसांनी पोळचा भयानक खुनी दरिंद्री चेहरा उघड केल्यानंतर संपुर्ण वाई तालुक्‍यासह अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. आपल्या नीच पाशवी क्रत्याने दक्षिण काशीला कलंकीत केलेल्या खुनी पोळच्या मुसक्‍या आवळून आज बरोबर दोन वर्ष पुर्ण होवूनही क्रुर कर्मा राक्षसी पोळवरील सहा खुनांच्या खटला सुनावनीला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने यात निष्पाप जीवांचे बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांची काळजी वाढू लागली आहे.  तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील चार महिलांसह व वाई शहरातील सलमा नावाची अनाथ मुलगी व व्यापाऱ्याचा निर्घुनपणे खुन करून एकुण सहाजणांच्या संपुर्ण कुटुंबाला अनाथ व उध्वस्त बनवुन पोळाने धोम येथील स्वत:च्या रहात्या घरात व फार्म हाऊसवर सात फुट खोल खड्यात मुडदे गाडून पवित्र तिर्थक्षेत्राच्या भुमीचे तिर्थ नासवले होते .  पुरलेल्या सहा मुडद्यांच्या जागेवरच सहकारी मित्रांना पार्टया देवून पुरलेल्या मडयावरच लोणी खात तेरा वर्ष देवाला सोडलेल्या एखाद्या ‘पोळा’ (वळू) प्रमाणे गावभर मोकाट फिरणाऱ्या नराधम पोळाने अनेकांना वेगवेगळया मार्गाने ‘डुशा’ मारत अनेक कुटुंब उध्वस्त केली होती.

अशा क्रुर दानवाला मरेपर्यंत लवकरात लवकर फाशीच झाली पाहीजे ही एकच मागणी पिडीत नातेवाईकांकडून आजही केली जात आहे $$ सर्व वाईकर जनतेसह बळीं गेलेल्या सहा जणांच्या नातेवाईकांचा न्यायदेवता व कायदयावर ठाम विश्वास असला तरी त्या क्रुरकर्मा नराधमाच्या गळयाला फाशीचा दोर कधी आवळणार याचाच घोर सगळयांना लागून राहीला आहे सध्या पोळ कळंबा झेलमध्ये असला तरी त्याने बचावासाठी मिळवलेला वकील पहाता त्या वकीलाची नेमणूक कोणी केली? त्याची असणारी फी कोण भागवणार ? त्यासाठी ऐवढे पैसै कसे व कोण जमवणार?त्यांना कोणकोण कशी कुठुन माहीती पुरवणार? का पुरवतय? असे अनेक प्रश्न नातेवाईक व जनतेतुन उपस्थीत केले जात आहेत तर पोळने केलेले सहा खुन स्वत: एकटयानेच केले का? त्याला कुणी मदत केली? तर त्याने केलेले खुन नक्की कशासाठी केले याचे खरे कोडे आजही नातेवाईकांना व वाईचे जनतेला उलगडले गेलेले नाही .

तसेच खुन करून मुडदे गाडण्यासाठी खड्डे काढणारे सहाजणांचा खुन करताना वापरलेल्या इंजेक्‍शनचा पुरवठा करणारे व पुरवणारे,नीच पोळाला पोसणारे व खुनांच्या मोहीमेत त्यास साथ करून पोलीसासह महसूल कर्मचाऱ्यांना लाच लुचपत विभागाच्या जाळयात अडकवून कित्येकांच्या घरादारांवर नांगर फिरवत लाखो रूपयांची कमाई छापणाऱ्यांच पुढे काय झाल? व होणार? याचही उत्तर शोधताना जनता व नातेवाईक आजही चाचपडत आहे.

दोन वर्षा नंतरही बळी गेलेल्या जीवांचे सगळे नातेवाईक न्यायदेवतेकडे एकटक डोळे लावून सत्य न्यायाची वाट बघत घालमेल झाले आहेत “भगवान के घर पे देर है अंधेर नही” या एका आशेवर ठामपणे विश्वास ठेवत पोरकी झालेली आई,बहीण,मुलगा,मुलगी नातवंड व पती हे सर्वजण नीच संतोष पोळाला ‘फाशी’च होईल या दुखमय भावनेतुन जीवनाची वाटचाल करत असून नराधम ‘पोळा’ला मरेपर्यंत फाशीच्या ‘सुळा’वर चढवलेला बघण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत तर पोळ ‘सुऴावर’ चढल्यावरच नव्हे तर खरोखर सुऴावर’लटकल्या’वरच पोळाच्या शिकार ठरलेल्या त्या निष्पाप सहा जीवांच्या भटकणाऱ्या आत्म्यांना व त्यांच्या पोरक्‍या कुटुंबांना अखेरची शांती मिळेल अशी तीव्र संतापजनक भावना व्यक्त करत खुन खटल्याला गती मिळावी याची प्रतिक्षा वाईकर व्यक्त करत आहेत.

( बाहेर असताना त्रास देणारा पोळ आजही जेल मधून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून प्रशासनाला हैराण करत आहे सहा नव्हे तर 36 खून केल्याचे सांगून दिशाभूल करत असल्याचे बोलले जात आहे )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)