नरसिंहपूर येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी सहकार्य

हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही

नीरा नरसिंहपूर- श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांचे सोयीचे ठिकाणी पुनर्वसन व्हावे, यासाठी सहकार्य केले जाईल. बुडीत बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करून निश्‍चितपणे मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे दिली. शनिवारी सकाळी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे दर्शनासाठी आलेले माजी मंत्री पाटील यांची गावातील सुमारे 37 कुटुंबीयांनी भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. या ग्रामस्थांना जागा खाली करण्याच्या नोटीसा शासनाने पाठविल्या आहेत. ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्यावर मार्गदर्शन करताना पाटील यांनी या सर्व कुटुंबीयांचे गावानजीक गायरान जमिनीवर पुनर्वसन व्हावे, याकरीता शासनपातळीवर प्रयत्न केला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी पाटील यांची नीरा नरसिंहपूर, टणू, गिरवी, पिंपरी, शेवरे, संगम या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी भेट घेऊन श्री क्षेत्र नरसिंहपूर येथे संगमाच्या ठिकाणी होत असलेल्या बुडीत बंधाऱ्यांच्या आराखड्यामध्ये तळ पातळी व उंबरठा पातळी ही चुकीची असल्याचे सांगितले.
यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पाटील यांनी बुडीत बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले नरसिंहपूरचे ग्रामसेवक गणेश लंबाते यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, उपसरपंच विलास ताटे देशमुख, नाथाजी मोहिते, अभय वॉकर, प्रकाशराव मोहिते, संजय बोडके, दादा पाटील, बापू जगदाळे, शरद जगदाळे, राजेंद्र निंबाळकर, वर्धमान बोडके, रघुनाथ सरवदे, डॉ. सिद्धार्थ सरवदे, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)