नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगावकर पाण्यामुळे समाधानी

नीरा नरसिंहपूर – उजनी धरणातून भीमा नदीत नऊ दारातून पंधरा हजार क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सोलापूर शहराबरोबर इंदापूर तालुक्‍यातील नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगाव व माढा तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. तसेच पंढरीत वारकरांची स्नानाची सोय झाली आहे. भीमा नदीतील पाणी मागील एका महिन्यांपासून आटल्याने नदी कोरडी पडली होती. त्यामुळे नदी काठावरील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. त्यातच विज बिलासाठी रोहित्रांची वीज कापल्याने शेतातील उभी पिके जळू लागली होती. त्यामुळे पाणी व विजेसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाली. भीमा नदीत नऊ दारातून सुरुवातीला अडीच हजाराने तर नंतर 15 हजार क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे औज बंधाऱ्याबरोबर टाकळी बंधाऱ्यांसह इंदापूर तालुक्‍यातील नरसिंहपूर, टण्णू, भाटनिमगाव बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. तसेच विहिरी, बोअर यांना पाणी वाढणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)