नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यात यश 

बेशुध्द करण्याऐवजी डोक्‍यात गोळी घातली

यवतमाळ: मागील दीड वर्षापासून 13 जणांचा बळी घेणाऱ्या टी वन वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे.मोहीमेवेळी वाघीण अंगावर चालून आल्याने तिला शूट करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.पण वनविभागाच्या या कारवाईवर टीका करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत या वाघिणीला ठार करण्यात आले आहे. यानंतर पंचनामा करुन तिला नागपूरला हलवण्यात आले आहे.राळेगाव जंगलातील सराठी बोराटी येथील नाल्यात वाघिणीला नाल्यात ठार करण्यात आले आहे.या भागात कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले होते.वाघीण असल्याच्या खुणा आढळून आल्याने सकाळपासून वनविभागाने या ठिकाणी ट्रॅप लावण्यात आले होते. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तीच्या डोक्‍यात गोळ्या झाडून ठार करण्यात आले.

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती आणण्यात आले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर शार्पशुटर, मोठे पिंजरे, वन कर्मचाऱयांची फौज वाघिणीचा शोध घेत होती. तसेच पॅरामिटरच्या मदतीने हवाई शोधदेखील घेण्यात आला होता. परंतु हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे पहायला मिळाले होते.सर्वोच्च न्यायालयाने प्रधान मुख्य वन संरक्षक याचा निकाल कायम ठेवत वाघिणीला युद्धपातळीवर जेरबंद करा अथवा ठार करा, असे आदेश दिले होते. अखेर शार्पशुटर नवाब शाफत अली खान यांचा मुलगा शुटर अजगर अली यांना त्या वाघिणीला ठार करण्यात यश आले आहे.

रात्री साडेदहाच्या सुमारास वन विभागाचे पथक या भागात गस्तीवर पोहोचले. वाजताच्या सुमारास ही नरभक्षक ‘टी-वन’ वाघीण झुडपातून बाहेर आली. काही कळायच्या आत तिने थेट जिप्सीवर हल्ला केला. यावेळी पथकातील शेख मुकबीर शेख या शूटरने ट्रेनलाइस डॉट मारला आणि ती पुन्हा आक्रमक झाली. ती जीप्सीवर झेप घेणार, तोच असगर अली यांनी बचावासाठी तिच्या डोक्‍यात गोळ्या घातल्या आणि ठार मारले.

प्राणीमित्रांचा आरोप 
या वाघिणीला ठार मारल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या वाघिणीला आधी ट्रेंकुलाइजचे इंजेक्‍शन देऊन बेशुद्ध करायला हवे होते. मात्र तसे न करता थेट या वाघिणीला गोळ्या घालण्यात आल्या, असा आरोप प्राणीमित्रांकडून करण्यात येत असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)