नमो ऍप मधून मिळालेला डाटा आम्ही विकला नाही

अमेरिकेतील कंपनीने केला खुलासा
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ऍप मधील डाटा ज्या अमेरिकन कंपनीला पुरवण्यात येत होता त्या अमेरिकन कंपनीने या ऍप मधून मिळालेला डाटा आम्ही विकला नाहीं किंवा तो भाडे तत्वावरही कोणाला दिला नाही असे म्हटले आहे.

नमो ऍप मधील हा डाटा क्‍लेव्हर टॅप कंपनीला मिळत होता. ही कंपनी पाच वर्षांपुर्वी अमेरिकेतील तीन भारतीय युवकांनी स्थापन केली आहे.त्या कंपनीकडे नमो ऍप या मोदींच्या ऍप वरील डाटा आपोआप हस्तांतरीत होत आहे. त्याचा क्‍लेव्हर ऍप ही अमेरिकन कंपनी मोबाईल मार्केटिंग प्लॅटफार्म साठी वापर करीत आहे असा आरोप केला गेला आहे. मोदींच्या नमो ऍप मध्ये जो कोणी साईन ईन करतो त्यावेळी त्याची व्यक्तीगत माहिती त्याच्या अनुमती शिवाय अमेरिकेतील या कंपनीला पुरवली जात आहे.

तथापी ही माहिती केवळ विश्‍लेषणासाठी वापरली जात आहे असे स्पष्टीकरण भाजपतर्फेही देण्यात आले आहे. क्‍लेव्हर टॅप या कंपनीचे एक संचालक आनंद जैन यांनी हा वाद निर्माण झाल्यानंतर प्रकाशित केलेल्या एका ब्लॉग मध्ये म्हटले आहे की आम्हाला मिळालेला डाटा आम्ही कधीही विकला नाहीं. तो भाड्याने दिलेला नाही किंवा त्याचा गैरवापरही केलेला नाही. ही कंपनी ऍनलॅटिक्‍स कंपनी म्हणून अमेरिकेतील अन्य कंपन्यांसाठी काम करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)