‘नमो अॅप’वरून डेटा लीक – राहुल गांधी

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लीकवरून देशात एकीकडे गोंधळ निर्माण झाला असताना दुसरीकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो अॅप’वरून वादळ निर्माण होण्याची चिन्ह आहेत.  कारण या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी माहिती उघड केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर ##DeleteNaMoApp मोहीमही राबवण्यात येत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ”मी नरेंद्र मोदी, तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपनीतील माझ्या मित्रांना देत आहे,” असे उपरोधिक ट्विट राहुल यांनी केले आहे.

राहुल यांनी रविवारी ट्विट करत, ‘हाय, माझे नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही जेव्हा माझ्या अधिकृत अॅपवर साइनअप करता, त्यावेळी मी तुमचा सर्व डेटा अमेरिकी कंपन्यांतील माझ्या मित्रांना देतो’, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, नमो अॅपचा वापर करणाऱ्या लोकांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकी कंपन्यांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेसने याच मुद्द्यावरून मोदी आणि भाजपला घेरले आहे. नरेंद्र मोदी अॅपवर प्रोफाइल तयार करणाऱ्यांची खासगी माहिती ‘क्लेवर टॅप’ नावाच्या अमेरिकी कंपनीला पाठवली जाते, असा दावा करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)