नमिश हिड, दिया बोरुंद्या, राज दर्डा, प्रिशा शिंदे यांची आगेकुच

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धा

पुणे: नमिश हिड, दिया बोरुंद्या, राज दर्डा, काव्या देशमुख, प्रिशा शिंदे, मृणाल शेळके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात नमिश हिडने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत अगस्त्य भामिडीपातीच्या 6-1 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. निरज जोरवेकरने विरेन चौधरीचा 6-5(7-5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. मुलींच्या गटात संघर्षपुर्ण लढतींमध्ये दिया बोरुंद्याने काव्या पांडेचा 6-5(8-6) असा तर अरोही देशमुखने स्वानीका रॉयचा 6-5(7-4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

तर, 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अमोघ दामलेने शार्दुल खवळेचा 6-5(7-2) टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.राज दर्डाने रोहन बजाजचा तर सुर्या काकडेने राज दर्डाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. मुलींच्या गटात शौर्या सुर्यवंशीने आदिती सागवेडकरचा 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली. काव्या देशमुखने वैश्‍णवी सिंगचा तर मेहक कपुरने मृणाल शेळकेचा 6-1 असा पराभव केला.

सविस्तर निकाल : राऊंड रॉबीन फेरी 8 वर्षाखालील मुले – नमिश हिड वि.वि अगस्त्य भामिडीपाती 6-1, सुजय देशमुख वि.वि दक्ष पाटील 6-3, निरज जोरवेकर वि.वि विरेन चौधरी 6-5(7-5).
8 वर्षाखालील मुली – दिया बोरुंद्या वि.वि काव्या पांडे 6-5(8-6), अरोही देशमुख वि.वि स्वानीका रॉय 6-5(7-4).
10 वर्षाखालील मुले – राज दर्डा वि.वि रोहन बजाज 6-0, तेजा ओक वि.वि कार्तिक शेवाळे 6-1, अमोघ दामले वि.वि शार्दुल खवळे 6-5(7-2), सुर्या काकडे वि.वि राज दर्डा 6-0, शिवांश कुमार वि.वि रोहन बजाज 6-1.
10 वर्षाखालील मुली – काव्या देशमुख वि.वि वैश्‍णवी सिंग 6-1, मेहक कपुरवि.वि मृणाल शेळके 6-1, प्रिशा शिंदे वि.वि रितिका कापले 6-1,
शौर्या सुर्यवंशी वि.वि आदिती सागवेडकर 6-0, मृणाल शेळके वि.वि काव्या देशमुख 6-2, प्रिशा शिंदे वि.वि शौर्या सुर्यवंशी 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)