नमाजाचे नेतृत्व करणाऱ्या मुस्लिम महिला इमामांना धमक्‍या

मल्लपुरम – केरळातील जमिथा नावाच्या एका 34 वर्षीय मुस्लिम महिलेने गेल्या शुक्रवारी या जिल्ह्यातील वडनूर गावात झालेल्या नमाजाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांना आता धमक्‍या यायला सुरूवात झाली आहे. तथापी त्यांनी आपण अशा धमक्‍यांना न घाबरता यापुढेही जुम्मा नमाजाचे नेतृत्व करीतच राहू असे म्हटले आहे.

जमिथा या कुरान सुन्नत सोसायटीच्या सरचिटणीस आहेत. त्यांनी गेल्या शुक्रवारच्या नमाजाचे नेतृत्व करताना वेगळा पायंडा पाडला होता. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक सुरू असतानाच त्यांना धमक्‍याही यायला सुरूवात झाली आहे. त्यांनी सांगितले की सोशल मिडीयावरूनही या धमक्‍या आल्या असून त्यात मला आता जीवंत ठेवले जाणार नाही, मला जीवंत जाळले जाईल, मी इस्लाम नष्ट करीत आहे असे नमूद करण्यात आले आहे तथापी आपण असल्या धमक्‍यांना घाबरत नाही असे त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

-Ads-

या धमक्‍यांच्या संबंधात आपण पोलिसांतही तक्रार दिलेली नाहीं असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की आपण यापुढेही आपले हे कार्य सुरू ठेवणार आहोत. त्यांनी सांगितले की कुराणात महिला आणि पुरूष असा भेदभाव करण्यात आलेला नाही आणि मुस्लिम महिलांनी इमाम म्हणून काम करू नये असेही लिहीलेले नाही. त्यांनी नेतृत्व केलेल्या गेल्या शुक्रवाराच्या नमाजात 80 जण सहभागी झाले होते. कुराण सुन्नत सोसायटी ही चेक्कान्नुर मौलवींशी संबंधीत संस्था आहे. हे मौलवी एडापल जिल्ह्यातील आधुनिक विचारांचे मौलवी म्हणून ओळखले जातात. तथापी या मौलवींचे 1993 साली अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)