मुंबई-परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीची मारा चालूच असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे मंगळवारी शेअरबाजारात बरीच विक्री झाली. त्यामुळे तीन दिवसांनंतर शेअरबाजाराचे निर्देशांक घसरले. मंगळवारी बॅंका आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी विक्री केल्याचे दिसून आले.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 216 अंकानी कमी होऊन 34949 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 55 अंकांनी कमी होऊन 10633 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्‍स 820 अंकांनी वाढला होता.
किरकोळ गुंतवणूकदार आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सकाळी निर्देशांकात थोडी फार वाढ झाली होती. मात्र रुपया घसरल्यानंतर पुन्हा विक्रीचा जोर वाढला. सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांच्या शेअरच्या भावात आज मोठ्या प्रमाणात घट झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)