नफेखोरी बळावल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकांत घट 

व्यापार युद्ध चिघळण्याची शक्‍यता वाढली 
मुंबई -बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर या वर्षात आणखी तीन वेळा व्याजदरात वाढ करण्याच्या पूर्वी जाहीर झालेल्या धोरणात कसलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सकाळी शेअरबाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली होती. नंतर मात्र नफेखोरीने उचल खाल्ल्यानंर निर्देशांकांत घट झाली. अमेरिकेच्या निर्णयामुळे केवळ शेअरबाजारावरच नाही तर चलन, कर्जरोखे आणि इतर बाजारावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आगामी काही काळात कोणत्या बाजारावर कसा परिणाम होईल याचा अंदाज गुंतवणूकदारांना येण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. काही विश्‍लेषकांनी अमेरिकेचा निर्णय वेगाने विकसित होणाऱ्या देशाच्या भांडवलावर परिणाम करणारा असेल असे सांगितले आहे.

गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 129 अंकांनी म्हणजे 0.39 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 33006 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी म्हणजे 0.39 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 10114 अंकावर बंद झाला. या अगोदरच्या दोन दिवसात थोड्या फार निवडक खरेदीमुळे सेन्सेक्‍स 213 अंकांनी वाढला होता. काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 98 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 197 कोटी रुपयांच्या शेअरची खरोदी केल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला होता.
आज झालेल्या नफेखारीमुळे रिऍल्टी, भांडवली वस्तू, वाहन, तंत्रज्ञान कंपन्या, सरकारी कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच बॅंकांच्या शेअरवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

अमेरिका, युरोप आणि आशियायी शेअरबाजारातही आज कमी अधिक प्रमाणात विक्रीचे वातावरण होते. अमेरिकेच्या व्याजदर वाढीचे आणि व्यापार धोरणाचे काय परिणाम होतात याचा अंदाज गुंतवणूकदार घेत आहेत. तोपर्यंत गुंतवणूकदार कुंपनावर बसून राहण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेने चीन बौद्धिक मालमत्ता कायद्याचा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण नियमाचा भंग करीत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे अमेरिका चीनवर या आठवड्यात काही निर्बंध आणण्याची शक्‍यता आहे. जर अमेरीकेने तसे केले त चीनही जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचे चीनने सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेने अनेक देशाविरोधात व्यापारयुद्ध पुकारले आहे. यामुळे गुंतवणूकदार फारशा खरेदीच्या मनस्थितीत नसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)