नफेखोरीमुळे शेअर निर्देशांकात घट

धातू, नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू कंपन्यांना फटका

मुंबई – क्रुडचे वाढत असलेले दर आणि जागतिक बाजारात रोख्यावरील वाढत असलेल्या परताव्यामुळे कालपासून जागतिक शेअरबाजारात विक्रीचे वातावरण आहे. त्यातच भारतीय बाजारातील डेरीव्हेटिव्हची मुदत उद्या संपत असल्यामुळे भारतीय शेअरबाजारात आज बरीच विक्री झाली आणि निर्देशांक कमी झाले. शेअर निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळेही गुंतवणूकदार सावध आहेत.

बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 115 अंकांनी कमी होऊन 34501 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 43 अंकांनी कमी होऊन 10570 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्‍स 201 अंकांनी वाढला होता.

गेल्या काही दिवसापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार एकतर्फी विक्री करीत आहेत. काल त्यानी 680 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 508 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.आज माहीती तंत्रज्ञान कंपन्याचे शेअर वधारले तर धातू क्षेत्रातील कंपन्यांची घसरण चालू राहीली.

आज धातू क्षेत्राचा निर्देशांक 1.43 टक्‍क्‍यानी, तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 1.33 टक्‍क्‍यांनी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 1.20 टक्‍क्‍यानी, बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक 1.08 टक्‍क्‍यांनी, पायाभूत सुविधा क्षेत्राचा निर्देशांक 0.80 टक्‍क्‍यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 0.42 टक्‍क्‍यांनी कमी झाला. टीसीएस, महिंद्रा, इन्फोसिस, पावर ग्रीड, एस बॅंक, बजाज ऍटो, कोल इंडिया, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आजच्या पडत्या काळातही बरीच वाढ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)