कोट्टयाम/ कोची – ख्रिश्‍चन ननवर बलात्कार केल्याचा आरोप झालेले बिशप फ्रॅन्को मुलाक्कल यांनी आपल्याकडील जालंधर प्रदेशाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. कॅथोलिक धर्मगुरुंच्या गटातील एका धर्मगुरुकडे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सुपूर्त केल्या आहेत.

कॅथोलिक चर्चच्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून संबंधित ननला न्याय मिळण्याची मागणी करायला सुरुवात्‌ केली होती. त्या सर्व संघटनांच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या मेसेंजर मॅथ्यू कोक्कान्दम यांच्याकडेच बिशप फ्रॅन्को यांनी आपल्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. सर्व धर्मगुरु, नन आणि बिशप अधिकारातील भागाच्या सदस्यांना उद्देशून केलेल्या संदेशामध्ये त्यांनी याबाबत घोषणा केली. आपल्या स्वतःसाठी संबंधित पीडीत ननसाठी प्रार्थना करण्याची विनंतीही त्यांनी सदस्यांना केली आहे.

बलात्काराच्या पुराव्यांमध्ये काही विरोधाभास आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. बलात्काराच्या आरोपाच्या चौकशीसाठी केरळ पोलिसांनी फ्रॅन्को यांना 19 सप्टेंबर रोजी चौकशीला हजर होण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित पीडीत ननला न्याय मिळावा यासाठी कोचीमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी फ्रॅन्को पायउतार झाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)