नदी स्वच्छता करून प्रजासत्ताक दिन करा

रामनदीची स्वच्छता करणार : जीवित नदी संस्थेचे आवाहन

पुणे – देशातील नैसर्गिक संपदेचे जतन ही देखील एक देशसेवा आहे. या संपदेचे जतन करून देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीवित नदी संस्थेतर्फे रामनदी येथील नदीकाठ स्वछ करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यात नागरिकांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जीवित नदी ही संस्था गेली अनेक वर्षे नदी संवर्धनाबाबत काम करत आहे. संस्थेचे सभासद दर रविवारी सकाळी शहरातील नदीकाठ स्वच्छतेचा उपक्रम राबवितात. आतापर्यंत औंध, डेक्कन, विठ्ठलवाडी अशा विविध ठिकाणी नदीकाठांची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच सामुहिक प्रयत्नांतून विठ्ठलवाडी येथील राडारोड्यांमुळे गाडला गेलेला जुना घाट पुनर्जीवित करण्यात आला आहे.

याबाबत संस्थेच्या शैलजा देशपांडे म्हणाल्या, “नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपल्या देशाची संपदा आहे. नदीदेखील त्या संपदेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आपल्याही जीवनाशी तिचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. या संपदेचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. या कार्यातून देशसेवाच घडणार असल्याने, आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी (दि.26) सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमासाठी नागरिकांची मदतही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)