नदी सुधार प्रकल्पासाठी 200 कोटी कर्ज रोखे उभारणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांच्या सुधारणा प्रकल्पासाठी 200 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्याकरिता महापालिकेची आर्थिक पत चांगली अअसल्याने हे कर्जरोखे उभारण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे या बाबीचा महापालिकेच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून पवना व इंद्रायणी या दोन नद्या वाहतात. भौगोलिकदृष्या हे शहराला मिळालेले वरदान आहे. मात्र, या दोन्ही नद्यांची अवस्था भयावह झाली आहे. नदीपात्रातील आक्‍सिजनच्या कमतरतेमुळे सजीव मृत होत असून, जलपर्णीची वाढ प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या वतीने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याच्या अणेकदा घोषणा झाल्या. प्रत्यक्षात यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने नद्यांच्या सर्वेक्षणासाठी एका खासगी संस्थेची नेमणूक केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक पत चांगली असल्याने, नव्याने नोकरभरतीसाठी करण्याची महापालिका प्रशासनाची मागणी राज्य सरकारने होल्ड वर ठेवली आहे. मात्र, आता नदी सुधार प्रकल्पासाठी महापालिका कर्जरोखे उभारण्याच्या तयारीत आहेत. अंदाजपत्रक सादर करताना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या आर्थिक सक्षमतेमुळे कर्जरोखे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. सरकारकडून किफायतशीर दरांत उपलब्ध झाल्यास ते परत करणेसुद्धा फारसे अडचणीचे ठरणार नाही. भविष्यात होणाऱ्या फायद्यातूनच त्याची परतफेड केली जाणार आहे. तसेच या कर्जरोख्याला सबसिडीचादेखील लाभ मिळू शकतो, अशी भुमिका मांडली.

शिलकीमुळे अंदाजपत्रकाचा फुगवटा
महापालिकेचे 37 वे अंदाजपत्रक सादर करताना, आयुक्‍त हर्डीकर यांनी गेल्यावर्षीचे सुधारित अंदाजपत्रकही सादर केले. गतवर्षीच्या तरतुदीमधील 1390 कोटी रक्कम शिल्लक राहिली आहे. याशिवाय केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा 1352 कोटी 68 लाखांच्या खर्चाचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकातील आकडेवारीत वाढ झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)