नदी संवर्धनाच्या कामकाजावर ‘जायका’ची नाराजी

जपान सरकारकडून 1 हजार कोटींचा निधी


योजनेसाठी येणार 950 कोटी रुपयांचा खर्च


निधीचा करार होऊन 2 वर्षे उलटली


नियोजित वेळेत खर्च झालेला नाही

पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या “नदी संवर्धन’ प्रकल्पाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने यासाठी 1 हजार कोटींचा निधी देणाऱ्या जपान सरकारने महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या योजनेसाठीच्या निधीचा करार होऊन 2 वर्षे झाली तरी नियोजित वेळेत खर्च झालेला नाही. त्यामुळे खरंच ही योजना राबविण्याबाबत महापालिका गंभीर आहे का? असा प्रश्‍न जपान सरकारने उपस्थित केला आहे.

जपान येथील जायका कंपनीच्या सहकार्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेकडून मुळा-मुठा नदी सुधारणा योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे 950 कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी येणार आहे. त्यात 11 नवीन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून शहरात निर्माण होणारे 100 टक्‍के सांडपाणी शुद्ध करून ते नदीत सोडले जाणार आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पास जानेवारी-2016 मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल 23 महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर-2017 मध्ये या योजनेसाठी लंडन स्थित सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप या योजनेच्या कामांच्या निविदा निघालेल्या नाहीत. तसेच कामही सुरू झालेले नाही. या कामासाठी केंद्राकडून आतापर्यंत 65 कोटींचा निधी आला असून त्यातील 30 कोटीच खर्च झाले आहेत. या निधीतून 27 कोटींचे भूसंपादन आणि उर्वरीत निधीतून बाणेर-बालेवाडी भागात ड्रेनेज टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रत्यक्षात नदीपात्राच्या परिसरात दिसेल असे काहीच काम सुरू झालेले नाही. तसेच केंद्राकडून वेळोवेळी निधी दिला जात असतानाही तो खर्ची पडत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे या योजनेसाठी निधी देणाऱ्या जायका कंपनी आणि जपान सरकारने थेट नाराजी व्यक्त केली आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या नाराजीबाबतचे पत्र, नुकतेच जायका इंटरनॅशनल कॉर्पोरेशने महापालिकेस पाठविले असून तातडीने या योजनेचे काम सुरू करावे, अशा सूचना पालिकेस दिल्या आहेत.

ही प्रकल्पाची सद्यस्थिती
महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियाच सुरू आहे. सहा निविदांमध्ये हे काम केले जाणार असून त्यातील 3 निविदांचे प्री क्वॉलिफिकेशन झाले आहे. तर, 3 निविदांच्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. या योजनेंतर्गत बाणेर-बालेवाडी भागात सुमारे 25 कोटींच्या ड्रेनेजचे काम सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)