नदीसुधार प्रकल्पाच्या भूसंपादनातही अपयश!

11 पैकी 5 मलनि:सारण प्रकल्पांच्या जागाच ताब्यात नाहीत

पुणे – नदीसुधार प्रकल्पासाठी 11 मलनि:सारण केंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी केवळ 6 मलनि:सारण प्रकल्पाची जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. 5 प्रकल्पांच्या जागाच महापालिकेच्या अजून ताब्यात न आल्याने फक्‍त 6 मलनि:सारण केंद्रासाठी निविदा प्रक्रिया प्रशासनाने राबविली आहे. त्यामुळे प्रशासन वेळेत भूसंपादन करण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्रशासनाने नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत 2017 मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली. एकूण 990 कोटींचा हा प्रकल्प आहे. यानंतर या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. त्यांनी प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला केंद्रशासनाकडून अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने “जायका’ कंपनीकडून कर्ज घेतले आहे.

नदी सुधार योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध ठिकाणी मलनि:सारण केंद्र उभारण्यात येणार आहेत. नदीमध्ये जमा होणाऱ्या अशुद्ध पाणी संकलित करुन यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे सध्या महापालिकेने 6 मलनि:सारण प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. याध्ये 277 एमएलडी अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे.

केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या कंपन्यांनाच या प्रकल्पासाठी निविदा भरता येणार आहेत. त्याचबरोबर निविदेसाठी कंपन्यांकडून खर्च मागविण्यात आला आहे. महापालिकेला या निविदा मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी निविदा पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

असे आहे जागेचे गणित
प्रशासनाला पुणे विद्यापीठ येथील 1.62 हेक्‍टर शासकीय जमीन अजून ताब्यात घेता आली नाही. त्याचबरोबर चार जमिनी खासगी मालकांच्या आहेत. यामध्ये खराडी येथील 1.26 हेक्‍टर, वारजे 1.06 हेक्‍टर, वडगावशेरी 2.5 हेक्‍टर जमिनीचे अजून भूसंपादन झालेले नाही. या प्रकल्पासाठी केंद्रशासनाने 2023 ही अंतिम मुदत आहे. प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर भाजपने मोठा गाजावाजा केला. वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आणि भूसंपादन करण्याचे आवाहन आता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)