“नदीसुधार’ कामावरून केंद्राची नाराजी

संग्रहित छायाचित्र

सोमवारी दिल्लीत तातडीची बैठक 


कृती आराखडा, निधीवर होणार निर्णय


वेळोवेळी निधी येवूनही खर्ची पडत नाही

पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या नदी संवर्धन प्रकल्पाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने केंद्र शासनाने महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या कामाचा कृती आराखडा आणि निधी खर्ची पाडण्यासाठीचे वेळपत्रक निश्‍चित करण्यासाठी सोमवारी (दि. 3 डिसेंबर) दिल्ली येथे तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे.

जपान येथील जायका कंपनीच्या सहकार्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेकडून मुळा-मुठा नदी सुधारणा योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे 950 कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी येणार आहे. त्यात 11 नवीन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून शहरात निर्माण होणारे 100 टक्‍के सांडपाणी शुद्ध करून ते नदीत सोडले जाणार आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पास जानेवारी-2016 मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल 23 महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर-2017 मध्ये या योजनेसाठी लंडन स्थित सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप या योजनेच्या कामांच्या निविदा निघालेल्या नाहीत. तसेच कामही सुरू झालेले नाही. या कामासाठी केंद्रासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी आला असून त्यातील 30 कोटींचा खर्च झाला आहे. या निधीतून 27 कोटींचे भूसंपादन आणि उर्वरीत निधीतून बाणेर-बालेवाडी भागात ड्रेणेज टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रत्यक्षात नदीपात्राच्या परिसरात दिसेल असे काहीच काम सुरू झालेले नाही. तसेच केंद्राकडून वेळोवेळी निधी दिला जात असतानाही तो खर्ची पडत नसल्याचे चित्र आहे.

-Ads-

ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने महापालिकेच्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या कामास महापालिकेकडून गती मिळत नसून संथगतीने हे काम सुरू आहे. तसेच अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेला निधीही खर्ची पडत नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पाची आढावा बैठक पुढील आठवड्यात दिल्लीत बोलविण्यात आली आहे. त्यात महापालिकेस प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)