नढवळला वाळू सम्राटांवर कारवाई

ट्रॅक्‍टर, यारीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

वडूज, दि. 4 (प्रतिनिधी) – नढवळ, ता. खटाव येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपसा करणारे ट्रॅक्‍टर, यारी व कॉम्प्रेसर मशीनसह लाखो रुपयांचा ऐवज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर व कर्मचारी भरारी पथकाने धाड टाकून जप्त केला.
शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने नढवळ येथील येराळा नदी पात्रात वाळू उपसा करणारा ट्रॅक्‍टर, एक यारी, कॉम्प्रेसर मशीन धाड टाकून जप्त केला. कारवाईत खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, नायब तहसीलदार सुधाकर दाहींजे, दहिवडीचे नायब तहसीलदार नामदेव पोटे, तलाठी गणेश बोबडे, संतोष ढोले, गोपाळ बिडकर, राजेंद्र शिंदे, आदींसह वडूज पोलीस ठाण्याचे पो. नि. यशवंत शिर्के, पो. हवा. संग्राम बाबर, वाघमारे मॅडम, कदम मॅडम व कर्मचारी सहभागी झाले होते.
वाळू उपसा करणारे यंत्रे व वाहन पकडून वडूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली असून वाळू उपसा करणारे यंत्रे दादा गावडे यांच्या मालकीची असल्याचे समजते. कारवाईमुळे तालुक्‍यातील वाळू सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)