सातारा :राधा कृष्णच्या वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेले बाल राधा कृष्ण.

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) – येथील नटराज मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्‍तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जन्माष्टमीनिमित्त मंदिरात प्रथमच बाल राधा कृष्णाची वेशभूषा स्पर्धां आयोजित करण्यात आली.
या वेशभूषा स्पर्धेसाठी 2 वयोगट होते, त्यात पहिला वयोगट जन्मापासून ते 5 वर्षांपर्यंत आणि दुसरा वयोगट 6 वर्षे ते 12 वर्षापर्यंत होता. अनेक बाल चमु नटून थटून बाल राधा आणि बाल कृष्णाच्या रुपात दाखल झाले होते. या बालकृष्णांनी हातात मुरली तर बाल राधांनी डोक्‍यावर दह्या दुधाचे हंडे घेउन लटकत मुरडत स्टेजवर आपली कला सादर केली. अगदी तान्हुला बालकृष्ण ही या स्पर्धेत वेगळाच भाव खाऊन गेला. लोणी खाणारा बालकृष्ण, मुरलीमनोहर , फोटोला आइं बाबांकडे पोझ देणारा अशी अनेक रुपे या लहानग्याकडून पहायला मिळत असताना उपस्थित अगदी हरखून गेले होते. या स्पर्धेत प्रत्येक गटात 3 बक्षीसे काढण्यात आली त्यात प्रथम क्रमांकास 1हजार रुपये, द्वितिय क्रमांकास 700 रुपये व तृतीय क्रमांकास 500 रुपये देण्यात आले. मान्यवर परीक्षक आणि पाहुण्यांचे हस्ते ही बक्षीसे वितरीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)