नटराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

सातारा – सातारा शहराच्या पूर्वेकडील सातारा-कोरेगाव मर्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील प्रसिद्ध असणाऱ्या नटराज मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारपासून ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर किमान शंभर ते दोनशे लहान मोठे-खड्डे पडली आहे. दररोज नटराज मंदिरात शेकडो भक्‍त दर्शनासाठी येत असतात. दिवसरात्र पडणाऱ्या पावसामुळे तो रस्ता खड्डेमय झाला आहे. काही महिन्यापूर्वी ग्रेड खडी टाकून खड्डे भरुन घेतले होते, परंतू या रस्त्यावरील सततच्या वर्दळीने पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे. नागरिकांना या रस्त्यावरून जाताना नकोसे झाले आहे.

तसेच एखादे चारचाकी वाहन या रस्त्यातील खड्डयातून जोरात गेले तर बाजूला उभे असणाऱ्याच्या अंगावर चिखलाचे पाणी उडते. या मार्गावर असे खूप प्रकार होत असतात. त्यामुळे अनेक भक्‍तांमध्ये नाराजगी पसरली आहे. मंदिराच्या विश्वस्तानी खा. उदयनराजे भोसले यांचेकडे मागणी करुन खासदार फंडातून हा संपूर्ण रस्ता व मंदिरा बाहेरील परिसर डांबरीकरण करून मिळावे असे अनेकदा मागणी केली होती. त्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी हा रस्ता करुन देतो असा शब्दही दिला होता. पण त्यावर अजूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्‍तगणांनी हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी विनवनी मंदिरांच्या विश्वस्तांना सुद्धा केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)