नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच – सुप्रिया सुळे

प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदे – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे अनेक तगडे उमेदवार आहेत. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच आहे. नगर लोकसभेची जागा हवी असल्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप कॉंग्रेसकडून आला नसल्याचे सांगत, नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, मंजुषा गुंड आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, राज्यात राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी असले तरी राष्ट्रवादीच्या आमदारांची कामगिरी मात्र अव्वल आहे. प्रत्येक परिस्थितीत अधिकाधिक उत्तम काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. राज्याचा सर्वांगीण विकास होऊन महाराष्ट्र देशात अव्वल बनावा, हाच आमचा प्रयत्न आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे निंदनीय प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्र छेडछाडमुक्त होण्यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या ‘दादा’ला राज्यातून अनेक ठिकाणाहून विधानसभा लढण्यासाठी कार्यकर्ते आग्रह करीत आहेत. ‘दादा’ एकटा किती जागांवर लढणार? असा सवाल उपस्थित करीत कार्यकर्त्यांचा आग्रह हा आम्ही सन्मान समजतो. मात्र ‘दादा’ने बारामतीमधूनच लढावे असे मला वाटते, असे म्हणत सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत-जामखेड मधून लढणार असल्याच्या चर्चांना एकप्रकारे नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)