नगर रोडच्या पर्यायी रस्त्यांची वाघोलीत मलपट्टी

वाघोली- शंकर पार्वती मंगल कार्यालयाच्या शेजारून आरएमसी मार्गे बाईफ रोडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून बाईफ रोडच्या वाहनचालकांनी महामार्गाहूनविरुद्ध दिशेने जाण्याऐवजी या पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन उपसरपंच संदिप सातव यांनी केले आहे. नगररोडला पर्यायी अनेक रस्त्यांची मलमपट्टी करण्याचे काम ग्रामपंचायतीने केले असल्याचे सातव यांनी सांगितले.
बाईफ रोडकडे जाण्यासाठी महामार्गावरील वाहनचालक वाघेश्‍वर चौकातून विरुद्ध दिशेने वाहतूक करीत असतात. बाईफ रोडकडे जाण्यासाठी शंकर पार्वती मंगल कार्यालयाच्या शेजारून आरएमसी मार्गे पर्यायी रस्ता आहे. पावसाळ्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती त्यामुळे या रस्त्याचा वापर केला जात नव्हता. वाघोली ग्रामपंचायत व उद्योजक संपत गाडे यांनी जीएसबी थर व मुरूमचा वापर करून पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली आहे. सध्या पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी वापरता येत असल्याने वाहनचालकांनी या पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या पावसामुळे नगररोडला पर्यायी असणाऱ्या वाघोलीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेकांना या रस्त्याचा वापर करता येत नसल्याने नगरमहामार्गावर ताण येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने केसनंद फाटा येथे बीआरटीच्या मागील रस्ता, श्रेयस मंगल कार्यालयाशेजारील, फुलमळा, एपिक सोसायटी व काळे ओढा येथील रस्ता दुरुस्त केले आहेत. पर्यायी रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे महामार्गावरील ताणदेखील कमी होत आहे.
पुणे-नगर महामार्गाच्याकडेला असणाऱ्या हातगाड्या व छोटी दुकाने मागे घेण्याच्या सूचना लोणीकंद पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. वाघोली गाव, सराफ कट्टा, उबाळेनगर येथे पोलिसांनी दुकानदारांना सूचना केल्या आहेत. दुकानांचा व वाहनांचा वाहतुकीला अडथळा होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन काम करीत आहे. वाहतुकीला अडथळे आणणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोडमल यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)